Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शिवाजीनगरचा गोल्डन मेलडीजने जिंकली रसिक पुणेकरांची मने.

30 Mar 2024
पुणे (दि.२९) विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर ने “गोल्डन मेलडीज” हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर केला.टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब शिवाजी नगरच्या अध्यक्ष डॉ.स्मिता जोग,सचिव भारती डोळे, जिल्हाधिकारी डॉ.सुहास नेवसे,माजी प्रांतपाल पंकज शहा,भावी प्रांतपाल शितल शहा व नियोजित प्रांतपाल संतोष मराठे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या कार्यक्रमात कलाकारांनी जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी बहारदार पणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी बोलतांना डॉ.स्मिता जोग यांनी कार्यक्रमातून झालेले उत्पन्न हे सामाजिक कार्यासाठी प्रदान करणार असल्याचे सांगितले. छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite