पुणे (दि.२९) “ जिल्हा न्यायालये ही सर्वोच्च न्यायालयापेक्षाही महत्वाची आहेत” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.न्या.अभय ओक यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे आणि सेमिनार विभाग – स्टेट क्लायमेट अॅक्शन सेल डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायर्नमेंट अॅन्ड क्लायमेट चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने कुंदनमल सभागृहात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड.अशोक पलांडे, सचिव धनंजय कुलकर्णी, प्रा.डॉ.सुनिता आढाव, आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.अभिजित घोरपडे राज्य हवामान कृती संचालक सेल,महाराष्ट्र शासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात कायदा मसुदा स्पर्धा पार पडली.यात बारामतीच्या वसंतराव पवार विधी महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक मिळविला. डि.वाय पाटील विधी महाविद्यालय पिंपरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच कायदा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली यात डि.वाय पाटील विधी महाविद्यालयाने प्रथम आणि गव्हर्नमेंट विधी महाविद्यालय यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
छायाचित्र : न्या.अभय ओक मार्गदर्शन करतांना.