Peoples Media Pune header

Go Back

जैन सोशल ग्रुपच्यावतीने अंताक्षरी स्पर्धा संपन्न.

10 Jan 2022

सध्याच्या तनावग्रस्त कालखंडात मनावरील तनाव हलका करणे व निखळ मनोरंजन व्हावे या हेतूने जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन व पुणे झोन यांच्या संयुक्त विद्यमाने अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले संस्कृतिक भवन वानवडी येथे  संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील संघांनी भाग घेतला. याचे आयोजन युवराज शहा यांनी केले. प्रमुख पाहुणे बिरेन शहा,सचिन शहा,अमोल झवेरी,दिलीप मेहता,सुजस शहा,चंचल कुचेरिया,राजीव शहा,प्रशांत जैन,दिलीप चोरबोले आदी मान्यवर व सदस्य आणि कुटुंबिय उपस्थित होते. स्पर्धा पुणे झोनने जिंकली. कोरोनाच्या नियमावलीचे पालन स्पर्धेत करण्यात आले. 

छायाचित्र : अंताक्षरी स्पर्धा विजेते व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite