Peoples Media Pune header

Go Back

*विषयांची मर्यादा ओळखून आणि वेळेचे भान ठेवून होणारा संवाद हा अतिशय प्रभावी असतो : डॉ. नीलम गोऱ्हे*स्त्री आधार केंद्राच्या कार्यशाळेत प्रतिपादन

17 Sep 2022

पुणे, ता. १६ : संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे प्रभावी संवाद असतो, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यशाळांच्या मालिकेतील एक कार्यशाळा आज पुण्यात महिला सुरक्षा कार्यशाळा या नावाने घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी. औषधांचे परिणाम आणि वितरण, विपणन याच सोबत औषधे विकत घेताना घ्यायची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. अपर्णा पाठक यांनी हवामान बदलांचा होत असलेला परिणाम आणि याविषयी समाजाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केलं पुण्याच्या अन्न व औषध पुरवठा विभागाचे अधिकारी शीतल घाटोळ, अर्चना झिंजूर्णे यांनी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी आणि त्याबाबत काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत स्त्री आधार केंद्राच्या सचिव अपर्णा पाठक, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, शेलार गुरुजी, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, विद्या होडे, शर्मिला येवले, आश्लेषा खंडागळे, ज्योती चांदेरे आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पुणे शहरातील नागरी समस्या, पावसाळ्यातील समस्या या विषयांवर प्रा. विद्या होडे यांनी तर शर्मिला येवले यांनी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळावी तर आरोग्य सुरक्षेसाठी शहरात आरोग्य विषयक फवारणी करण्यात यावी असा ठराव ज्योती चांदेरे यांनी मांडले. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. आभार शेलार गुरुजी यांनी मानले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite