Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब औंधच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे अग्नीशमन प्रात्यक्षिक

27 Feb 2017

मराठी भाषा दिनानिमित्त रोटरी क्लब औंधच्या व एक्सलंस ध्यास फौंडेशन वतीने औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली.अग्निशमनदल प्रमुख एस,बी.जिल्हावार यांनी आपत्ती व्यवस्थापन-अग्नी शमन कसे करावे याची माहिती दिली व जवानांनी प्रात्यक्षिके करून दाखवली.या प्रसंगी रोटरी क्लब औंध अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल,एक्सलन्स ध्यासच्या अध्यक्ष डॉ.मनीषा भरडे,प्राचार्या मंजुश्री बोबडे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हावार यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनी अग्निशामक साधने कशी वापरतात याची माहिती करून घ्यावी व इतरांना ही सांगावी असे सांगितले.तोष्णीवाल यांनी बोलताना विविध संस्थानी आपल्याकडे असलेली अग्निशमन सामुग्री योग्य स्थितीत आहेका इकडे लक्ष द्यावे.असे सांगितले.

छायाचित्र :आगीवर प्रतिबंधक पावडर फवारताना विद्यार्थिनी

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite