Peoples Media Pune header

Go Back

२३ते २९ जानेवारी प.पू.श्री ल कृष्णनामदास महाराज यांचे श्रीमद भागवत कथा सप्ताह प्रवचन.

17 Jan 2023

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)शाखा श्री ब्रजबिहारी मंदिर खामगाव.ता.जुन्नर,जि.पुणे यांच्यावतीने ब्रजगोशाळा व भक्तनिवास निर्माण हेतूने दि २३ जानेवारी २०२३ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान संध्याकाळी ५.०० ते ९.०० या वेळात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प.पू.कृष्णनामदास महाराज श्री ल प्रभूपादजी यांचे शिष्य हे श्रीमद भागवत कथा सप्ताहात कथा निरूपण करतील. यामध्ये १)भागवत महात्म्य,२)परिक्षित आणि शुकदेव संवाद,३)श्री कृष्णजी यांच्या २४ अवतारांची कथा,४) श्री कृष्णजन्म (नंदोत्सव)५)गोवर्धन,६)रुक्मिणी विवाह,७)सुदामा भेट ,परिक्षित उद्धार यांचा समावेश आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अनेक वरिष्ठ व व्यक्तींनी देह सोडला तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा  तत्सम अनेक व्यक्ती यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती मिळावी या हेतूने हा सप्ताह आयोजित केला आहे. प्रवेश व पार्किंग मोफत आहे.तसेच सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite