Peoples Media Pune header

Go Back

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे नागरिकांसाठी मोफत ताकपोईचे उद्घाटन

02 Apr 2017

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर व जैन अॅलर्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महावीरस्वामी ताकपोईचे उद्घाटन करण्यात आले.फुलवाला चौक गुरुवार पेठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी  आचार्य –सम पंन्यासप्रवर श्री चंद्रशेखर विजयजी म.सा.यांचे शिष्य प्रवचनकार पंन्यास राजरक्षित विजय म.सा.मुनी नयरक्षित विजय,यांच्या उपस्थितीत नवीनभाई गाला(लिबर्टी स्टोर्स)यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी चंदूभाई शहा,भूपेंद्रभाई शहा,राजूभाई शहा,भरतभाई शहा,चिराग दोशीजैन अॅलर्ट ग्रुप आदी मान्यवर उपस्थित होते.या ठिकाणी रोज सुमारे १२०० ते १५०० ग्लास ताक नागरिकांनी मोफत वितरीत करण्यात येईल.या प्रसंगी मार्गदर्शन करताना पंन्यास राजरक्षित विजय म.सा.यांनी भगवान महावीर यांनी विश्वातील सर्व जीवांवर करुणा करणे हा धर्म आहे.तहानलेल्यांना पाणी,भुकेल्याला अन्न देणे सामजिक कार्य असल्याचे सांगितले.

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite