Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब औंधच्यावतीने डोंगरगाव शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

03 Apr 2017

रोटरी क्लब औंधच्या वतीने लोणावळा जवळील डोंगरगाव येथील जि.प.प्राथमिक  शाळेतील आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट प्रदान करण्यात आले.यात स्कूल बॅग,कंपास,रायटिंग पॅड,वह्या इत्यादींचा समावेश होता.या प्रसंगी रोटरी क्लब औंधचे अध्यक्ष रो.दो.दीपक तोष्णीवाल,सेक्रे वर्षा कुलकर्णी,शिल्पा सोमाणी,शाळेच्या शिक्षिका शैला काळे व वैशाली पवार,रो.प्रवीण लाखे,रो.विनिता,रो.कामाक्षी,वर्षा,रो.पद्मजा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाणी गाऊन दाखविली.तसेच त्यांचे देश व महाराष्ट्रा विषयी सामान्य ज्ञान पाहून सर्वजण प्रभावित झाले.यावेळी बोलताना शिक्षकांनी अतिचय प्रतिकूल परिस्थिती व गरिबी असताना सुद्धा हे विद्यार्थी खूप हुशार असून परिश्रम करतात असे सांगितले.व त्यांच्या विविध गरजांसाठी समाजाची मदत अपेक्षित असल्याचे सांगितले.दीपक तोष्णीवाल यांनी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल असे सांगितले.

छायाचित्र;- विद्यार्थी शिक्षक व मान्यवर यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite