Peoples Media Pune header

Go Back

रोटरॅक्ट क्लब(युवा रोटरी)औंधच्यावतीने प्रसन्न ऑटीझम सेंटरला व्हॅन प्रदान

03 Apr 2017

जागतिक ऑटीझम दिनानिमित्त रोटरॅक्ट(युवा रोटरी) क्लब औंध व रोटरी क्लब औंध यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसन्न ऑटीझम सेंटर डेक्कन यांना मारुती इको व्हॅन प्रदान करण्यात आली.या प्रसंगी रो.डॉ.दीपक तोष्णीवाल(अध्यक्ष रोटरी क्लब औंध),रोटरॅक्ट शुभम नवले(अध्यक्ष रोटरॅक्ट क्लब औंध),प्रसन्न ऑटीझमचे अध्यक्ष प्रसाद गोडबोले, डायरेक्टर सुभाष केसकर,मॅनेजिंग डायरेक्टर साधना गोडबोले,सेक्रेटरी सुचेता राजहंस,ट्रस्टी अलका साठे, रोटरॅक्ट अमित वाईकर, रोटरॅक्ट प्रसाद पाटील, रोटरॅक्ट यशोधरा कोलूर, रोटरॅक्ट अथर्व उलंगवार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना साधना गोडबोले यांनी ऑटीझम या मुलांमधील बाबी बद्दल फारशी माहिती लोकांना नाही.व पुण्यात प्रसन्न ऑटीझमचे आणखी एक केंद्र सुरु करण्याचा मानस असून रोटरीसारख्या स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.त्याला रोटरी पदाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite