Peoples Media Pune header

Go Back

महालक्ष्मी पाटोत्सव शोभयात्रेने संपन्न.

06 Feb 2023

महालक्ष्मी मंदिर सोमवारपेठ यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय महालक्ष्मी पाटोत्सव भव्य शोभायात्रेने संपन्न झाला. यात  सुशोभित चित्ररथ,ध्वज पथक,ढोल ताशा पथक यांचा समावेश होता. लाडकत पेट्रोल पंप ते आपोलो टॉकी – केईएम रुग्णालय ते नरपतगिर चौक असा मार्ग होता. या तीन दिवसीय पाटोत्सवात नानी बाई का मायरा,सुंदरकांड यांचा समावेश होता. या शोभायात्रा प्रसंगी ट्रस्टी सरपंच डॉ.गुरुदत्त शर्मा,डॉ.अरुण जोशी. शरद नर्तेकर,भवरजी महाराज,गुरुजी महेश दवे आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक महिला व पुरुष तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.   

छायाचित्र : महालक्ष्मीचासुशोभित चित्र रथ . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite