Peoples Media Pune header

Go Back

“विशेष पाल्यांच्या संगोपन व प्रगतीमध्ये आईवडिलांचे कष्ट अत्यंत कौतुकास्पद”आ.डॉ.नीलमताई गो-हे

18 Apr 2017

  विशेष पाल्यांचे आईवडील,शिक्षक त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत असतात,मात्र यात आपल्या पाल्याच्या गुणांची जाण ठेवून त्यांना प्रोत्साहन देणा-या पालकांचे परिश्रम हे अत्यंत कौतुकास्पद आहेत.कु ओंकार यांच्या भावी जीवनासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.त्या कु.ओंकार राजकुमार चौधरी याने ऑस्ट्रिया येथील स्पेशल ऑलिम्पिक विन्टर गेम मध्ये फ्लोअर बॉल मध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल भारतीय कामगार सेनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या.कु.ओंकार चौधरी यांने यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ५ सुवर्णपदके,व देशपातळीवरील स्पर्धेत ४ सुवर्णपदके व अन्य अशी कामगिरी बजावली आहे.त्याला बोलता येत नाही व ऐकू येत नाही.तसेच कर्करोगाशीही(कॅन्सर) त्याने यशस्वी झुंज दिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रघुनाथ कुचिक(सरचिटणीस भा.का.से.)बंडू ब्रम्हे(पुणे विद्यापीठ युनिट अध्यक्ष),शिवाजी उत्तेकर(चिटणीस),वंदना वाघमारे(महिला अध्यक्ष),बाळासाहेब आंत्रे(उपाध्यक्ष).राजकुमार चौधरी(वडील)सौ.चौधरी(आई).आदी मान्यवरांच्या बरोबरच कामगारवर्ग उपस्थित होते.शाल.श्रीफळ.पुष्पगुच्छ,स्मृतीचिन्ह व रोख २५००० असे सत्काराचे स्वरूप होते.यावली बोलताना रघुनाथ कुचिक यांनी कामगार संघटना ही फक्त एक संस्था नसून ते एक कुटुंब आहे अशी हिंदुह्र्दयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असल्याचे सांगितले.

छायाचित्र:कु ओंकार चौधरी याचा सत्कार करताना नीलमताई गो-हे रघुनाथ कुचिक,व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite