Peoples Media Pune header

Go Back

नवनिर्वाचित काँग्रेस(आय)नगरसेवकांचा आ.अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार

22 Apr 2017

पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित काँग्रेस(आय)नगरसेवकांचा सत्कार काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आ.अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.जनसागर हॉल,शाहूउद्याना जवळ,झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक विजय तिकोणे,नगरसेवक-रवींद्र धंगेकर,सुजाता शेट्टी,रफिक शेख,अविनाश बागवे,लताताई राजगुरू,चांदबी नदाफ,रामचंद्र कदम,वैशाली मराठे,अजित दरेकर,आदी मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना आ.अनंतराव गाडगीळ यांनी काँग्रेस पक्ष हा पराभव पचवून पुन्हा फिनिक्स प्रमाणे झेप घेईल,नगरसेवक व कार्यकर्ते यांनी जनसंपर्क वाढवावा असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना रवींद्र धंगेकर यांनी मनपा मध्ये अद्याप प्रभाग रचना व अधिकारी ठरले नसल्याने कामे होत नाहीत.याला भाजप व प्रशासन जबाबदार आहे असे सांगितले.सुजाताताई शेट्टी यांनी काँग्रेस नगरसेविका या आपल्या प्रभागातील जबाबदारी यशस्वी पणे पार पडतील.सर्वसामान्याची कामे हेच त्यांचे प्राधान्य असल्याचे सांगितले.

छायाचित्र;सत्कारमूर्ती नगरसेवक व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite