Peoples Media Pune header

Go Back

योगदिना निमित्त ओलाच्या चालकांना प्राची देशपांडे यांच्याकडून योग व ध्यान प्रशिक्षण

21 Jun 2017

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ओला कार चालकांना तणावमुक्ती साठी योग व ध्यान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.वाघोली येथील मेपल हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १८० चालक व ओलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.योग शिक्षक व तणावमुक्ती तज्ञ प्राची देशपांडे  यांनी त्यांना योग,तणावमुक्ती,ध्यान यांचे प्रशिक्षण दिले.या प्रसंगी विश्वा रावत(मार्केटिंग),रोनक देसाई(सिनियर मार्केटिंग हेड),शुभेंदू रंजन(सिटी हेड)आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्राची देशपांडे  यांनी योग व सहज ध्यान याच्या मदतीने मन व आरोग्य निकोप राहते.व आनंदी जीवनाचा लाभ होतो असे सांगितले.व ध्यान आणि तणावमुक्ती प्रात्यक्षिके घेतली.

छायाचित्र ;तणावमुक्ती साठी ध्यान प्रात्यक्षिक घेताना प्राची देशपांडे  व ओला चालक- कर्मचारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite