Peoples Media Pune header

Go Back

ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन वाटप व विल्हेवाट मशीन वाटप मदतीसाठी रिगेन इंटरपीस कार्यक्रमाचे आयोजन

11 Jul 2017

ग्रामीण भागातील गुंडाळवाडी गाव व अन्य ठिकाणी महिलांच्या सुविधेसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप मशीन व त्याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी इन्सीरेटर(ज्वलन मशीन)देण्याच्या मदतीसाठी.प्राची देशपांडे यांनी रिगेन इंटरपीस(मनशांती परत मिळविणे)या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यातील नफ्यातून त्याच कार्यक्रमात सुमारे १५००००(दीड लाख)रुपयाच्या या मशीन्स हस्तांतरित करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शनिवार दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ५ ४५ ते ९ या वेळेत कलमाडी हायस्कूल(KHS)सभागृह एरंडवणा येथे संपन्न होईल.त्याची देणगी प्रवेशिका रु १२०० आहे.या कार्यक्रमात मनःशांती ही योगा व ध्यान याच्या सहाय्याने कशी मिळवावी याची माहिती व प्रात्यक्षिक केले जाईल.या संगीताचा सुद्धा समावेश आहे,तसेच या विषयी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील मार्गदर्शन करणार आहेत. असे आयोजक प्राची देशपांडे यांनी नमूद केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite