Peoples Media Pune header

Go Back

सावित्री फोरमच्या वतीने १६ जुलै रोजी “एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडे”नृत्यनाटिका

12 Jul 2017

सावित्री फोरम या महिला संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १६ जुलै रोजी एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडेही नृत्य नाटिका सादर करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऑडिटोरियमच्या सभागृहात संध्याकाळी ४.३० वाजता संपन्न होईल.याचे लेखन दिग्दर्शन सुप्रिया ताम्हाणे,नृत्य दिग्दर्शन जुई सुहास,संगीत रजनीश कलावंत यांचे असून सावित्री फोरमच्या सदस्या या महिला कलाकार आहेत.या नृत्यनाटिके मधून सावित्रीबाई फुले आणि आजची स्री यांच्या संभाषणातून स्री समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.कायर्क्रमास प्रमुख उपस्थिती आमदार योगेश टिळेकर,डेक्कन प्रीग्रेसिव्ह संस्थेचे संचालक गजानन एकबोटे ज्योत्स्नाताई एकबोटे,कृष्णकांत कुदळे,माजी आमदार कमलताई ढोले पाटील सासवड माळी साखर कारखान्याचे संचालक रंजन गिरमे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व नागरिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन सावित्री फोरमच्या अध्यक्ष दिपाली पांढरे  यांनी केले आहे.सावित्री फोरम ही महिलांची संस्था गेले ३ वर्ष कार्यरत असून सामाजिक भान व बांधिलकी जपणारी संस्था आहे कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite