Peoples Media Pune header

Go Back

कै.किशोरभाऊ विटेकर यांच्या जन्मदिनां निमित्त आरोग्य तपासणी शिबीर व छत्री वाटप

15 Jul 2017

शिवसेना पदाधिकारी किशोरभाऊ विटेकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.आज त्यांचा जन्मदिना निमित्त आरोग्य तपासणी शिबीर व छत्री वाटप कार्यक्रमाचे केळेवाडी येथे आयोजन करण्यात आले.यात ५०० नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात आली.दंत,रक्तदाब,मधुमेह,हाडांची ठिसूळता,स्री रोग चिकित्सा याचा समावेश होता तसेच ३०० नागरिकांना छत्रीवाटप करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवसहकार सेना उप जिल्हा प्रमुख अनिल विटेकर,पुरुषोत्तम विटेकर,संपर्कप्रमुख सत्यवान उभे,शिवसहकार सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे,उपजिल्हा संघटक स्वाती ढमाले,तालुका प्रमुख प्रकाश भेगडे,नितीन शिंदे,अनिल घोलप,विश्वास म्होकर,लकी रणदिवे,दत्ता दहिभाते,अरुण भिकुले,राधिकाताई हरीश्चंद्रे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सत्यवान उभे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक कार्यास प्राधान्य द्यावे असे नेहमी सांगितले त्याला अनुसरून कै किशोरभाऊ विटेकर यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन झाल्याचे सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite