युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले आरती केली.सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत व पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपतीचे दर्शन घेतले व आरती केली.तसेच तांबडी जोगेश्वरी,श्रीमंत दगडूशेठ हलवाई,गुरुजी तालीम,अखिल मंडई,व केसरीवाडा येथे पूजा व आरती केली.या प्रसंगी शिवसेना उपनेत्या व प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे,संपर्कप्रमुख उदय सावंत,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),किरण साळी(युवासेना),नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेविका पल्लवी जावळे,तम्मा विटकर(विभाग प्रमुख) श्रीधर पाटणकर,सौ.पाटणकर,संतोष गोपाल,मनीष जगदाळे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,शिवसैनिक,महिला आघाडी कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे,केसरीवाडा येथे महापौर मुक्ताताई टिळक,रोहित टिळक,शैलेश टिळक यांनी स्वागत केले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र व मराठी माणसाची भरभराट होवो,शेतकरी सुखी होवो,व महिलांना व सर्वाना सुरक्षीत व सन्मानाचे जीवन लाभो अशी गणेश चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.
छायाचित्र :आदित्य ठाकरे,नीलमताई गो-हे व पदाधिकारी ग्रामदैवत पहिला मानाचाश्री कसबा गणपतीची आरती करताना
© 2011. Peoples Media Pune