Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने विविध शाळांतील शिक्षकांचा सन्मान

24 Sep 2017

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने परिसरातील विविध शाळांमधील शिक्षकांचाआ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते राष्ट्रनिर्मातेपुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ, व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.बाणेर येथील आदित्य इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष रो.सत्यजित वळे,सचिव शेखर शेठ,शिवलाल नाना धनकुडे,अॅड हर्षल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आ.मेघाताई कुलकर्णी यांनी भारत हा तरुणाईचा देश म्हणून पुढे येत आहे.व प्रतिभावान खूप मात्र त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे,कुप्रसिद्ध डॉन दाऊद हा काही कमी बुद्धिमान नव्हता पण त्याने आपली हुशारी देशविघातक कामांत लावली.म्हणून विद्यार्थी दशेतच चरित्र,देशप्रेमाचे संस्कार होणे आवश्यक आहे.आर्य चाणक्य म्हणत शिक्षकांना तुम्ही कमी लेखू नका,त्याच्या मांडीवर निर्मिती व विध्वंस दोन्ही खेळत असतात.असे सांगितले.

छायाचित्र :शिक्षकांचा सन्मान करताना डावीकडून सत्यजित वळे,मेघाताई कुलकर्णी,शेखर शेठ,शिवलालनाना धनकुडे,  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite