Peoples Media Pune header

Go Back

कर्णबधीर व्यक्तींनी बनविलेल्या “दीपावली वस्तू”च्या प्रदर्शनास वाढता प्रतिसाद

12 Oct 2017

कर्णबधीर व्यक्तींनी बनविलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे डहाणूकर कॉलनीतील किर्लोस्कर कमिन्स हॉल मध्ये नुकतेच आयोजित करण्यात आले.येथे फराळाचे जिन्नस,शोभिवंत पणत्या,शोभेच्या,पूजेच्या वस्तू असे सर्व काही एका छता खाली उपलब्ध आहे.चाळीस स्टॉल्स  आहेत.या प्रदर्शनाला नागरिकाचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.कुटुंब फौंडेशनच्या अध्यक्ष कविता सदाशिवे यांनी प्रदर्शनास सहका-यांसह भेट दिली.व विविध वस्तूंची खरेदी केली.या प्रसंगीकविता सदाशिवे, भगीरथ शेजवळ,रोहित सदाशिवे,बळीराम शेजवळ,सत्येश हिरवे अॅड.प्रमोद बेंद्रे,दिनकर पळसकर,अमित मुंगळे,दिप्ती पुजारी,कुणाल प्रल्हादके,साद उपक्रम केंद्राच्या संचालिका विनया देसाई,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रदर्शन व विक्रीची वेळ सकाळी १० ते रात्री ९ अशी आहे.विनया देसाई यांनी बोलताना या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.व दरवर्षी वाढत आहे असे सांगितले.

छायाचित्र :दिप प्रज्वलन करताना कविता सदाशिवे व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite