Peoples Media Pune header

Go Back

हडपसर येथील चटका पिडीत बालिकेची आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी भेट घेतली

12 Nov 2017

हडपसर येथे लहान मुलगी माही हिने मसाल्यात पाणी सांडल्याच्या कारणावरून महिलेने तिला अनेक ठिकाणी चटके दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीची भेट घेतली,व विचारपूस केली.पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व महिला पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्याकडून केस सम्बन्धी व उपचारा सम्बन्धी माहिती घेतली.यावेळी चर्चा करताना डॉ.गो-हे यांनी या प्रकरणात बंगलादेशींकडून होणारे काही अनैतिक मानवी व्यापार(ह्यमन ट्राफिकिंग)चा काही समावेश आहे का या दृष्टीने शहानिशा करण्याचे सुचवले कारण काही काळापूर्वी अशीच एक सरोगसी केस या परिसरात घडली होती.मुलीस योग्य त्या संस्थेत दाखल करावे,चुकीच्या हाती ताबा मिळू नये,दोषींवर योग्य कलमे लावून कायदेशीर कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.एफआयआरची कॉपी तक्रारकर्त्या रजनीश तिवारी यांनी मिळाली नसल्याचे निदर्शनाला आल्यावर ती पोलिसांनी दिली.या प्रसंगी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,नगरसेविका प्राची आल्हाट,शेलार गुरुजी,शादाब मुलाणी,मनीषा वाघमारे,संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.

छायाचित्र :पिडीत मुलगी व तक्रारकर्त्याशी संवाद साधताना आ.डॉ.नीलमताई गो-हे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite