Peoples Media Pune header

Go Back

मल्हार परिवर्तन संस्थेच्या वतीने मोफत उद्योजकता मार्गदर्शन शिबीर २६ नोव्हेंबर रोजी

17 Nov 2017

मल्हार परिवर्तन संस्थेच्या वतीने युवक युवतींसाठी उद्योजकते विषयी मोफत मार्गदर्श शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी शिवशंकर सभागृह,महर्षीनगर,स्वारगेट जवळ,सातारा रोड,पुणे ३७ येथे सकाळी १० ते १ या वेळेत संपन्न होईल.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुहास खेमकर(संचालक आत्मा,कृषी विभाग),प्रमुख पाहुणे बबनराव शेळके(उद्योजक)असतील.शिबिरार्थीना पुढील मान्यवर मार्गदर्शन करतील.राजेंद्र कु-हाडे(राज्यकर उपयुक्त जी.एस.टी.विभाग),लहुराज गंडे(सनदी लेखपाल)गणेश खामगळ(मुख्य व्यवस्थापक मिटकॉन,रोहन काळे(उद्योजक),दाताजी म्हेत्रे(उद्योजक).या शिबिराचे संयोजन गंगाधर महानवर(अध्यक्ष मल्हार परिवर्तन संस्था),लहुराज गंडे(खजिनदार), तुकाराम देवकाते(खजिनदार),महादेव अर्जुन(सेक्रेटरी)यांनी केले आहे.तरी या शिबिराचा युवक युवतीने लाभ घ्यावा असे आवाहन गंगाधर महानवर यांनी केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite