Peoples Media Pune header

Go Back

“सिंह्गड रस्त्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पर्यायी रस्ता” निलय कॉम्प्लेक्स ते धनलक्ष्मी महालक्ष्मी सोसायटी पर्यंत

03 Dec 2017

गोसावी परिवाराच्या सहकार्यातून व नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या विकास निधीतून सनसिटी,धनलक्ष्मी महालक्ष्मी सोसायटी विठ्ठलनगर एकतानगरी परिसरातील नागरिकासाठी नवा पर्यायी रस्ता लवकरच सुरु होणार आहे.त्या रस्त्याचे उद्घाटन पर्वती मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच अंकिता अपार्टमेंट,नवचैतन्य मित्रमंडळ,साईनगर गणाधीश संकुल,माणिकबाग,वंदेमातरम मित्रमंडळ येथे ड्रेनेज लाईन व कॉंक्रीटीकरण याचे उद्घाटन करण्यात आले.तसेच पर्यायी रस्त्याला गोसावी परिवाराने ६४ गुंठे जागा दिली आहे.या आगोदर सुद्धा विठ्ठलवाडी ते वारजे हायवे जाणार होता तेव्हा गोसावी कुटुंबियांनी २००० साली १५२ गुंठे स्वतःची जागा महानगरपालिकेला हस्तांतर केली होती.परंतु हरितलवाद न्यायालयाच्या आदेशानुसार त्या रस्त्यावर स्थगिती आली व तो जमिनीवर न करता इलेवेटेड करावा असा निर्णय न्यायालयाने दिला.त्यामुळे वरील सोसायटीमधील नागरिकांची गैरसोय झाली होती.आता पर्यायी रस्ता झाल्यानंतर ती कमी होईल.या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक प्रसन्नदादा जगताप,श्रीकांत जगताप,नगरसेविका मंजुषा नागपुरे,नगरसेवक शंकरभाऊ पवार,नगरसेविका निताताई दांगट,सागर गोसावी,महेंद्र टेमगिरे,सचिन मोरे,शरद जगताप,भाऊसाहेब जगताप व इतर नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite