Peoples Media Pune header

Go Back

रोटरी मिडटाऊन अमरावतीच्या महिला स्तन व गर्भाशय कँन्सर तपासणी व्हॅनचे मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

15 Dec 2017

महिलांना होणारा स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी व रिपोर्ट मोफत सेवा देणा-या रोटरी क्लब मिडटाऊन अमरावती निर्मित तपासणी व्हँनचे माजी राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.रायगड या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री देवीसिंग पाटील, अमरावतीचे माजी प्रांतपाल रो.किशोर केडिया,रो.राजू मुंदडा,रो सुभाष,यादव,डॉ.स्मिता सिकची,मनीषा चांडक,माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर,भावी प्रांतपाल रवी धोत्रे,प्रांत सेक्रेटरी बिरेन धरमसी,एच.आर गायकवाड(बीव्हीजी हेड),रवींद्र जाधव(आरटीआय कॉम.पुणे)आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रतिभाताई पाटील यांनी कँन्सर म्हणले की मृत्यू असा पक्का समज आहे.मात्र त्याचे लवकर निदान झाल्यास तो बराही होऊ शकतो.यासाठी या व्हँनचा उत्तम उपयोग होईल असे सांगितले.व रोटरीने टीबी वर उपचार करणा-या डॉक्टर्स व स्टाफसाठी सुरक्षा मास्क पुरविण्याची योजना हाती घ्यावी असे सुचवले.किशोर केडिया यांनी बोलताना सुमारे एक कोटी खर्चाच्या या अत्याधुनिक व्हॅन मध्ये सुसज्ज यंत्रणा आहे,अमरावती शहरी व ग्रामीण भागात ही व्हॅन मोफत सेवा देणार आहे असे सांगितले.

छायाचित्र :लोकार्पण प्रसंगी प्रतिभाताई पाटील,देवीसिंग पाटील किशोर केडिया,दीपक शिकारपूर,रवी धोत्रे व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite