आज देवी शाकंभरी पोर्णिमा.या निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे ५१ प्रकारच्या विविध शाक भाज्यांची आरास करण्यात आली.ही आरास भव्य अशा इक्षुदंडू महालात(संपूर्ण ऊस वापरून) करण्यात आली.याची मध्यान्ह आरती शिवसेना प्रवक्ता व प्रतोद आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी सत्यजित गो-हे-परळीकर,लातीकाताई गो-हे,झेलम जोशी,माजी गटनेते अशोक हरणावळ,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),मंदिराचे कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम,उत्सव प्रमुख शिरीष मोहिते,आदी मान्यवर उपस्थित होते.उत्सवा नंतर या भाज्या अनाथ मुलांच्या संस्थेस प्रदान करण्यात येणार आहेत.या प्रसंगी महाराष्ट्रात अन्नधान्य,शाक-भाजीपाला उत्तम प्रमाणात पिकावा,शेतकरी व नागरिक सुखी व्हावेत अशी प्रार्थना केल्याचे आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी नमूद केले.
© 2011. Peoples Media Pune