Peoples Media Pune header

Go Back

रोटरी लोकमान्य नगरचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व आणि कौशल्य विकास शिबीर संपन्न

22 Jan 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर व रोटरॅक्ट क्लब ग्लोबल युथ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय नेतृत्व व कौशल्य विकास शिबीर दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संपन्न झाले.यात २२ देशांतील २० ते २५ वयोगटातील सुमारे ११० युवक युवतींनी सहभाग घेतला.हे हे शिबीर अॅग्रो टुरिझम रिसोर्ट साठेसाई गाव येथे झाले.शिबिराचे उद्घाटन शशांक इनामदार(एक्स सीईओ &एम डी प्राज इंडस्ट्रीज) यांनी केले.या शिबिरात चर्चासत्र,मार्गदर्शन,खेळ,शांतता फेरी,फिटनेस प्रोग्राम,यांचा समावेश होता.हे शिबीर नियोजित करण्यात रोटरी लोकमान्यनगरचे अध्यक्ष रो.राजेंद्र बोडे,रो.संगीता बोनडे,माजी अध्यक्ष रो.विलास रवांदे,नियोजित अध्यक्ष रो.वासवी मुळे,रोटरॅक्ट अध्यक्ष मेहनुर मिस्त्री,सदस्य रो.अजय वाघ,रो.टीना रात्रा,रो.लता रवांदे,सुजाता वाघ,सतीश शेवाळकर,रो.अमृता व संजीव सहस्त्रबुद्धे,रो.पौर्णिमा बऱ्हाटे,यांनी विशेष परिश्रम केले.रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीने विशेष सहकार्य केले

छायाचित्र :सहभागी विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र    

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite