Peoples Media Pune header

Go Back

“विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हणून अभ्यास करू नये तर त्या त्या विषयात रस घेवून अभ्यास करावा”विशाल धनवडे(नगरसेवक)

04 Feb 2018

१० वि १२ वि परीक्षेला बसणा-या विद्यार्थी विद्यार्थिनीनी फक्त अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून अभ्यास न करता त्या विषयात रस घेवून अभ्यास करावाअसे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.परफेक्ट क्लास संस्थेच्या वतीने १० वि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.संस्थाचालक इरफान सय्यद यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे व पाठांतर करण्या एवजी समजून घेण्यावर भर द्यावा असे सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या मोफत मार्गदर्शन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून कौतुक करण्यात आले.या प्रसंगी जयप्रकाश पुरोहित(सामाजिक कार्यकर्ते),नगरसेवक-विशाल धनवडे,वनराज आंदेकर,हाजी गफूर पठाण,हाजी सय्यद,लक्ष्मी आंदेकर,हमीदा सुंडके,मा.न.रईस सुंडके,गजानन पंडित(सामाजिक कार्यकर्ते),समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण(गुन्हे शाखा)प्रशांत कसबे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

छायाचित्र .विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite