Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र करसल्लागार असो.च्या वतीने गृहिणींचा सत्कार

09 Mar 2018

जागतिक महिला दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने गृहिणींचा सत्कार करण्यात आला.संघटनेच्या यादव भवन येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,राजलक्ष्मी कदम(अॅडीशनल कमिशनर (CGST),हेमलता देवी(P.R.कमिशनर इन्कमटॅक्स पुणे),एम.व्ही.भानुमती(P.R.कमिशनर इन्कमटॅक्स पुणे),संजाली डायस(डेप्युटी कमिशनर SGST),हेतल गाला,गौरी मांजरेकर,नवनीतलाल बोरा(सेक्रेटरी)मनोज चितळीकर(सहसचिव),शरद सूर्यवंशी(खजिनदार)आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य व महिलावर्ग उपस्थित होता या प्रसंगी बोलताना एम.व्ही.भानुमती यांनी महिलांनी कायम दुय्यम भूमिका घेणे सोडावे,आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,मालमत्तेत नाव असावे,व स्वतःच्या कामाचा अभिमान असावा असे सांगितले.नरेंद्र सोनवणे यांनी टॅक्स क्षेत्रातील अधिकारी,सल्लागार हे त्यांच्यावर पडणा-या प्रचंड कामाचा दबाव असतानाही सक्षमपणे काम करतात कारण गृहिणी या घरातील अनेक जबाबद-या सांभाळत असतात असे सांगितले.म्हणून गृहिणींचा सन्मान केल्याचे सांगितले.

छायाचित्र:सन्मानचिन्हांसह सत्कारमूर्ती गृहिणी व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite