Peoples Media Pune header

Go Back

“अनिष्ट प्रथांविरोधात तरूण पिढीचा पुढाकार प्रशंसनीयआ.डॉ.नीलमताई गो-हे

13 May 2018

विवेक तायमाचीकर यांच्या सारख्या तरुणांनी समाजातील कौमार्य चाचणी सारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध आवाज उठविला.व आपण त्याचा विधान परिषदेत पाठपुरावा केला.त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती रामराजे निंबाळकर,सामाजिक न्यायमंत्री राजाराम बडोले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदा पास झाला.असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी विवेक तायमाचीकर व ऐश्वर्या(माजी महापौर कविचंद भाट यांची नात)यांच्या विवाह प्रसंगी केले.काळेवाडी येथील बालाजी लॉन येथे संपन्न झालेल्या या विवाह प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट,कौमार्य चाचणी प्रथेविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते कृष्ण इंद्रीकर,भारत तायमाचीकर,मुक्ता दाभोलकर,नागराज मंजुळे,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र :वधुवरांना शुभेच्छा देताना आ.डॉ.नीलमताई गो-हे व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite