Peoples Media Pune header

Go Back

पेट्रोल दरवाढ व अन्य विषयांसाठी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने कात्रज चौकात घंटानाद आंदोलन

10 Jun 2018

पेट्रोल दरवाढीने नागरिक ट्रस्ट झाले असून वाढ मोठ्या प्रमाणात होते मात्र घट १ पैसा,१० पैसे अशी होते.याचा व शेतकरी कर्जमाफी,बलात्का-यांना शिक्षा,पंपावर पारदर्शक पाईप, या मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पुणे शहर युवा विभागाच्या वतीने कात्रज मुख्यचौकात जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी बाबुराव क्षेत्रेपाटील(अध्यक्ष पुणे युवा विभाग),सचिन खंडाळे(उपाध्यक्ष पुणे युवा विभाग),रविराज उमप(कार्याध्यक्ष पुणे युवा विभाग),राहुल बोराडे(उपाध्यक्ष कामगार विभाग),आकाश गरुड(संघटक),अकबर मेमन,केशव कुमावत,राजू जगताप,महेश फडतरे,सागर पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच महिला सदस्या व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय,आता तुम्हाला बाय बाय,फडणीसांना बाय बाय,या व अन्य घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite