Peoples Media Pune header

Go Back

हॉटेल कॅफे डेक्कन कट्टा येथे डॉ.कुमार सप्तर्षी व सामजिक राजकीय कार्यकर्ते यांच्या रंगल्या गप्पागोष्ठी

30 Jun 2018

पुणे हे नेहमीच सामजिक,राजकीय,सांस्कृतिक चळवळीचे केंद्र राहिले आहे.सध्या पुण्यात जुन्या कट्टा संस्कृतीचे नव्या रुपात पुनरुज्जीवन झाले आहे यात विविध विचारसरणीचे लोक एकत्र येवून नाश्ता करीत अनौपचारिक संवाद साधतात.अशाच एका हॉटेल कॅफे डेक्कन कट्टा यथे आज समाजवादी विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या सोबत विविध पक्ष व संघटना कार्यकर्ते यांचा कट्टा रंगला यात शरद पवार यांचे पगडी नाट्य ते काश्मीर विलीनीकरण,नरेंद्र मोदी ते गल्लीतील कार्यकर्त यातील हितसंबंध,विविध किस्से तसेच कट्ट्यात सामील लोकांचे प्रश्न व अनुभव याने रंगत आली.या प्रसंगी सतीश मोहोळ,रुपलीताई पाटील,रवींद्र थोरात,दिलीपसिंग विश्वकर्मा,जांबुवंत मनोहर,संजय फुलपगार,सुकेश पासलकर,केशव तेलंगी,कैलास पवार,मनीषा कावेडिया.आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कुमार सप्तर्षी यांचा फेटा,व फुले पगडीने सत्कार करण्यात आला. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite