Peoples Media Pune header

Go Back

फेडरेशन सप्ताहा निमित्त जैन सोशल ग्रुप्सच्या वतीने इनडोअर गेम्स स्पर्धा

12 Aug 2018

जैन सोशल ग्रुप पुणे परिवारच्या वतीने फेडरेशन सप्ताह निमित्त विविध इनडोअर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.येरवडा येथिल क्रीडा संकुलात बुद्धिबळ,टेनिस,कॅरम व अन्य स्पर्धा झाल्या यात सुमारे ४०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.तसेच आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले याचा लाभ २२५ नागरिकांनी घेतला.या प्रसंगी झोनल को ऑर्डीनेटर नगरसेवक दिलीप चोरबोले,प्रमुख पाहुणे म्हणून निष्णात डॉक्टर ज्यांनी पुण्यातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया केली असे डॉ.मनोज दुराईराज,शरदभाई शहा(माजी अध्यक्ष जे.एस.जी.इंटरनॅशनल),राजीवभाई शहा(फेडरेशन डे चेअरमन),दिलीप मेहता,राजेश दोशी(माजी झोन को ऑर्डीनेटर),सतीश बाफणा(फेडरेशन उपाध्यक्ष),मांगीलाल कोठारी(चेअरमन महाराष्ट्र रिजन),राजेंद्र धोका(नियोजित चेअरमन),कल्पेश देसाई(स्पोर्ट्स को ऑर्डीनेटर),दिप डागा(व्हाईस झोन को ऑर्डीनेटर,आदी मान्यवरांच्या बरोबरच जैन समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.मनोज दुराईराज यांनी जीवनात खेळाप्रमाणे प्रथम-द्वितीय-तृतीय क्रमांक नसतो.असतो फक्त जीवन किंवा मृत्यू,योग्य आहार,विहार,व्यायाम,योग,खेळ यांनी जीवनाची लांबी वाढेल,व विपरीत वर्तनाने मृत्यू जवळ येईल असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :स्टेडीयम मध्ये मान्यवर व सहभागी स्पर्धक यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite