Peoples Media Pune header

Go Back

आयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड “मर्मविज्ञान”.चर्चासत्र २ सप्टेंबर रोजी

14 Aug 2018

आयुर्वेद व फिजीओथेरपी यांची सांगड घालणारे अद्भुत व आश्चर्यकारक उपचार पद्धती मर्मविज्ञानसंबंधी चर्चासत्र मर्मविज्ञान स्टडी फौंडेशनच्या वतीने रविवार दिनांक २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.हे चर्चासत्र टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय,रास्तापेठ येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत संपन्न होईल.फिजीओथेरपी व आयुर्वेद उपचारपद्धती यांची सुयोग्य सांगड घालणे शक्य आहे का ?,या गोष्टीचा उत्तम फायदा रुग्णाला होऊ शकतो का ?व या दोन स्वतंत्र उपचारपद्धतींचा एकत्रित उपयोग शक्य आहे का ?असे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चा सत्राचे गेली दोन वर्ष आयोजन करण्यात आले होते.यात फिजीओथेरपी मधील एक्झरसाईज व ट्रेनिंग शेड्युल बरोबरच आयुर्वेदातील सिसमी ऑइल( तिळाचे तेल) याचा एकत्रित उपयोग करण्याचे काय परिणाम होतात हे पाहण्यासाठी सर्व्हायकल डिस्क प्रॉब्लेम(मायनर) रुग्णांवर मानेच्या व्यायामाबरोबर सिसमी ऑइल मसाज करण्यासाठी सांगितले.त्याचे परिणाम आश्चर्यकारक आढळले.या अनुभवाचा फायदा मोठ्याप्रमाणावर रुग्णांना देण्यासाठी अशा प्रकारे नवीन नवीन एकत्रित उपचारांचे मार्ग शोधून काढणेसाठीचा हा एक प्रयत्न. योगशास्रास फिजीओथेरपीने मान्यता देवून आपल्यात सामावून घेतले मग आयुर्वेद समावून घेणे अवघड आहे का ?.अशा प्रकारचे विचार वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी या विषयांवरील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite