Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय उडानच्या उद्योजकांनी कॉफीपानाने केले नववर्षाचे स्वागत

31 Dec 2018

उद्योजक म्हटले कि मद्याला मान्यता असा सर्वसाधारण समज आहे.याला छेद देत बीएनआय या उद्योजकांच्या संघटनेच्या उडान चॅप्टरच्या उद्योजक सदस्यांनी नववर्षाचे स्वागत कॉफीपान करून केले.हॉटेल कपिला येथील साप्ताहिक बैठकीत हा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी बीएनआय पूर्वविभाग संचालक भरत डागा,अतुल जोगळेकर,उडान चॅप्टर अध्यक्ष डॉ.समीर डोलारे,सेक्रेटरी व खजिनदार नदीम विराणी,उपाध्यक्ष कुशल शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील उद्योजक व महिला उद्योजक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भरत डागा यांनी फक्त सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर उद्योजकांनी सुद्धा आपल्या वर्तनाने समाजात चांगला संदेश दिला पाहिजे,कॉफी ही मद्यापेक्षा आरोग्याला उत्तम आहे.हल्लीच्या युगात डिजिटल युग म्हणतात मात्र तरी सुद्धा मध्यम व लघु उद्योजकांना प्रगतीसाठी परस्पर प्रत्यक्ष भेट व संवाद याला खूप महत्व आहे.त्याने व्यवसायाची चांगली प्रगती होते.असे सांगितले.

छायाचित्र :कॉफीपानाने नववर्षाचे स्वागत करताना भरत डागा,समीर डोलारे व सदस्य उद्योजक उद्योजिका 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite