Peoples Media Pune header

Go Back

संत सेवालाल महाराज याची २८० वी जयंती उत्सव संपन्न

16 Feb 2019

बंजारा समाजातील महान संत सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती महोत्सव सेवाभाया गोरबंजारा युवा प्रतिष्ठाणच्या वतीने संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात काश्मीर येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.यानंतर संत सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात आला(नैवद्य अर्पण).तसेच समाजातील प्रतिष्ठीत उद्योजक,व नागरिकांचा सत्कार करण्यात आला.व राजस्थानी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक नंदकिशोर राठोड,काशिनाथ नखाते,विशाल यादव,नगरसेवक जितेंद्र ननावरे,सचिन सानप,मारुती भापकर,उद्योजक छगनजी राठोड,शामभाऊ शिंदे,नितीन चव्हाण,संतोष राठोड(मलिंगा)आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व बंजारा समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नंदकिशोर राठोड यांनी धार्मिक कार्यक्रमाबरोबबरच विखुरलेला बंजारा समाज एकत्र करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

छायाचित्र :संत सेवालाल महाराज जयंती प्रसंगी नंदकिशोर राठोड व मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite