Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय लक्ष्यच्या उद्योजकांनी खेळली फुलांनी होळी

21 Mar 2019

 उद्योजक हे नेहमी उद्योग कार्यात असतात.तरी ते सुद्धा पारंपरिक सणामध्ये ही सहभाग घेतात.बीएनआय या परस्परांना सहकार्य करणार्‍या संस्थेच्या सदस्यांनी ही होळीत सहभाग घेतला व फुलांनी हा सण पर्यावरण पूरक मार्गाने साजरा केला. हॉटेल शांताई येथील साप्ताहिक उद्योग बैठकीत याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बीएनआय ईस्ट रिजन पुणे भरत डागा.बीएनआय लक्ष्य चाप्टर अध्यक्ष संकेत बियाणी,उपाध्यक्ष दिपेश सोलंकी,सचिव विरेन नारकर आदि मान्यवरांच्या बरोबरच ६० उद्योजक सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना भरत डागा यांनी उद्योग,व्यवसाय व परस्परांना सहाय्य करताना आनंदाने व उत्साहाने राहावे असे संगितले.

छायाचित्र :पारंपरिक होली फुलांनी साजरी करताना बीएनआय सदस्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite