Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब अपटाऊनच्यावतीने नवनाथ येवले यांना “व्यावसायिक गुणवत्ता”,व दीपक उपाध्ये यांना “चिराग पुरस्कार” प्रदान

04 May 2019

रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने नवनाथ येवले(येवले चहा) यांना “व्यावसायिक गुणवत्ता”(व्होकेशनल एक्सलंस) पुरस्कार व दीपक उपाध्ये(अंध संगीतज्ञ) यांना “चिराग पुरस्कार” माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपुर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.आशीष प्लाझा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब अपटाऊनचे अध्यक्ष रो. समीर भिडे,सेक्रेटरी रो.अंजली देशमुख,रो. विजय खामितकर.लक्ष्मीकांत देशमुख(माजी साहित्य संमेलन अध्यक्ष) आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ,मानपत्र,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना रो.डॉ.दीपक शिकारपूर यांनी समाजात उच्च प्रतीची कामगिरी करणा-या व्यक्तींना सामाजा कडून प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते असे संगितले.या कार्यक्रम प्रसंगी रो.विजय खामितकर यांनी नवनाथ येवले व दीपक उपाध्ये यांची मुलाखत घेतली.    

छायाचित्र :डावीकडून दीपक उपाध्ये,नवनाथ येवले,दीपक शिकारपुर,समीर भिडे,अंजली देशमुख 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite