Peoples Media Pune header

Go Back

रोटरी पाषाणच्या वतीने संजय पारठे व सुजय डहाके यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान

13 May 2019

रोटरी क्लब पाषाणच्या वतीने आपत्ति निवारणात अतुलनीय कार्य करणारे संजय पारठे(सह्याद्रि ट्रेकर्स),व चित्रपट क्षेत्रात नवीन प्रयोग करणारे युवा दिग्दर्शक सुजय डहाके(फिल्म शाळा),यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार माजी प्रांतपाल रो.मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मराठा चेंबर्सच्या टिळक रोड येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पाषाणचे अध्यक्ष हेमंत जेरे,प्राजक्ता जेरे,सेक्रेटरी अवनी धोत्रे,समन्वयक प्रदीप कुलकर्णी प्रदीप वैद्य(नाट्य समीक्षक),आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. शाल,श्रीफल,सन्मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना मोहन पालेशा यांनी जीवनाचे यश व्यक्तीच्या प्रगतीत नाही तर त्याने समाजासाठी केलेल्या कार्याने मोजले जाते असे संगितले.सत्काराला उत्तर देताना संजय पारठे यांनी आपले विविध रोमांचक अनुभव संगितले.सुजय डहाके यांनी चित्रपट क्षेत्रात सुरूवातीला भरघोस यश मिळाले मात्र आजून संघर्ष करावा लागत आहे असे संगितले.या कार्यक्रमात  काही रोटरी क्लबनी लाफ्टर चॅलेंज  हा विनोदी कार्यक्रम सादर केला.

छायाचित्र :डावीकडून प्रदीप वैद्य,संजय पारठे,मोहन पालेशा,सुजय डहाके,हेमंत जेरे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite