Peoples Media Pune header

Go Back

गुणवंतांचा सत्कार,शंभर टक्के निकाल.

04 Jun 2019

भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाकडून चालविल्या जाणार्‍या बी एफ ए पेंटिंगच्या विद्यार्थ्यांना नुकतेच पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.न्यासाचे सचिव पुष्कराज भा पाठक व महाविद्यालयाचे प्राचार्य गजराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.न्यासाचे सचिव पुष्कराज भा पाठक यांनी या प्रसंगी प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले शंभर टक्के निकाल लागला याचा मला खूप आनंद आहे.विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून न्यासाचे दिवंगत सचिव भालचंद्र मोहिनीराज पाठक यांनी सदरील पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू केला त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.सचिव पुढे म्हणाले गरीब विद्यार्थ्यांना देखील सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून न्यासाचे प्रशासन सतत कार्यरत आहे.या प्रसंगी प्राचार्य चव्हाण यांनी न्यासाचे सचिव पुष्कराज भा पाठक यांच्या विध्यर्थ्यांप्रति असणार्‍या आत्मियतेचे खूप कौतुक केले.ते म्हणाले मॅनेजमेंट व विद्यार्थी यांच्यामध्ये एव्हड्या मोठ्या प्रमाणावर सुसंवाद कोणत्या महाविद्यालयात पाहावयास मिळत नाही.यावेळी पदवी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी खूप आनंदी दिसत होते.  

छायाचित्र :विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना भालचंद्र मोहिनीराज पाठक व गजराज चव्हाण

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite