Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कात्रजच्या अध्यक्षपदी विद्या पाटील यांची निवड.

01 Jul 2019

रोटरी क्लब कात्रजच्या अध्यक्षपदी रो.विद्या पाटील यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो.अनंत तिकोने यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी समीर प्रभूणे,खजिनदारपदी रो.मिना घळसासी यांची निवड करण्यात आली.हॉटेल ग्रीनपार्क बाणेर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रवी धोत्रे सहाय्यक प्रांतपाल धनंजय हिरवे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रांतपाल रवी धोत्रे यांनी रोटरी क्लब सदस्य हे फक्त आपलेच प्रकल्प राबवित नाहीत तर सामाजिक व सेवा कार्य करणार्‍या विविध संस्थांना ही सहकार्य करून त्यात मोलाची कामगिरी करतात असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष विद्या पाटील यांनी आगामी काळात समाजातील विविध घटक,नागरिक,विद्यार्थी,पर्यावरण,रोजगार,वैद्यकीय सेवा व अन्य विषयावर विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :विद्या पाटील 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite