Peoples Media Pune header

Go Back

रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपालपदी रो.रवी धोत्रे

05 Jul 2019

रोटरी प्रांत ३१३१च्या प्रांतपालपदी रो.रवी धोत्रे यांनी सूत्रे स्विकारली.मावळते प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्विकारली.रोटरी प्रांत ३१३१ मध्ये पुणे व रायगड जिल्ह्यातील १३३ रोटरी क्लब असून त्यात सुमारे ५००० रोटरी सदस्य आहेत.पीवायसी हिंदू जिमखाना यथे नुकत्याचा झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण एशिया संचालक रो.भारत पंड्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच रोटरीचे विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी आगामी योजनांविषयी बोलताना नवनिर्वाचित प्रांतपाल रो.रवी धोत्रे यांनी रोटरी प्रांत ३१३१ हा संपूर्ण आशिया खंडात साक्षरता अभियानात अग्रेसर असून ग्रामीण शाळांतील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी ग्रामीण भागातील १०० शाळांना रोटरीतर्फे हॅप्पी स्कूल योजने अंतर्गत ई लर्निंग संच देण्यात येतील.याद्वारे या योजनेतील लाभार्थीं विद्यार्थी संख्या १२ लाखावर पोहचेल. संख्या प्रौढ साक्षरतेसाठी शाळेतील मुलांना ई लर्निंग टॅब्लेट देण्यात येतील जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या घरातील व परिसरातील प्रौढाना साक्षर करू शकतील.६००० प्रौढाना साक्षर करण्याचे उद्दिष्ट्र आहे.दुर्गम परिसरातील दुष्काळ निवारण योजनेत एक हजार बोअरवेल्सना प्रत्येकी दहाहजार रुपये खर्चून रीचार्ज केले जाईल. खेड आंबेगाव परिसरात ग्रामीण महिलांना उत्पन्नाचे साधन म्हणून १००० गायींचे वाटप करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधानांच्या “आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुमारे ४ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे देण्यात येतील.तसेच प्रथमच रोटरीच्या नावाने हॉस्पिटल तयार करण्याची योजना असल्याचे रवी धोत्रे यांनी संगितले.भारतात रोटरी स्थापनेचे हे शताब्दी वर्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

छायाचित्र :रवी धोत्रे. प्रांतपाल रोटरी प्रांत ३१३१ 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite