Peoples Media Pune header

Go Back

रमणबाग शाळेच्या विद्यार्थ्यानी बनविल्या शाडू गणेशमूर्ति-रोटरी क्लब शनिवारवाडाचा उपक्रम

23 Aug 2019

रमणबाग शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ति.पर्यावरण रक्षण विषयी लहान विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी रोटरी क्लब शनिवारवाडाने या उपक्रमाचे आयोजन केले.रमणबाग शाळेत झालेल्या या उपक्रम प्रसंगी रोटरी क्लब शनिवारवाडाच्या अध्यक्षा अनिता पाटील,रो.शाम ढवळे,रो.संजय चव्हाण,रो.अपर्णा रानडे,रो.प्रभाकर पाटील,आरपी.सुभाष दांडेकर,मूर्तिकार प्रशिक्षक अभिजीत धोंडफळे,मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी  आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना तिलोत्तमा रेड्डी यांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करताना मूर्ति व सजावट यात मुलांचा सहभाग मोठा असतो त्यामुळे गणेशमूर्ती घेतांना ती शाडूमातीची घेण्याचा त्यांनी पालकांना आग्रह धरावा असे संगितले.

छायाचित्र :विद्यार्थी व मान्यवर शाडूमूर्तिसह समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite