Peoples Media Pune header

Go Back

बढाई आळी मित्रमंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान.

14 Oct 2019

कोजागिरी पोर्णिमेचे औचित्य साधूनबढाई आळी मित्रमंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.बढाई आळी मित्रमंडळाचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी त्याचे आयोजन केले.यात पुढील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.नगरसेवक हेमंत रासने यांना “आदर्श नगरसेवक पुरस्कार”,अंबादास लोखंडे व हासिना शेख यांना “पोलिस गौरव पुरस्कार”,डॉ.मिलिंद भोई यांना “समाज गौरव पुरस्कार”,डॉ.चिंतामणि अवचट यांना “डॉक्टर गौरव पुरस्कार”,रोहिणी सूर्यवंशी यांना “शिक्षण गौरव पुरस्कार”.घनश्याम गिड्वाणी व किशोर कलिया यांना “व्यापार गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल,श्रीफळ,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.बढाई आळी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शैलेश बढाई,नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होता.पुण्याचे महापौर मुक्ताताई टिळक यांनी पुरस्कारर्थींचे अभिनंदन केले व कार्यक्रमास सदिच्छा दिल्या.   

छायाचित्र :पुरस्कारार्थी व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite