Peoples Media Pune header

Go Back

“पुणे व बडोदे यांच्यातील संस्कृतिक संबंध ऐतिहासिक असून त्यामध्ये वाढ व्हावी”.राजमाता शुभांगीराजे गायकवाड

25 Oct 2019

पुणे हे महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी आहे तशीच बडोदे गुजरातची संस्कृतिक राजधानी आहे.या दोन शहरांमध्ये ३०० वर्षाहून अधिक ऐतिहासिक संबंध आज ही टिकून आहेत.संस्कृतिक,राजकीय क्षेत्रांत यांचे मोठे योगदान आहे.बालगंधर्वांचे नाटकांचा पहिला प्रयोग बडोद्यात होत होता.श्रीमंत सायजिराव गायकवड यांनी अनेक मान्यवरना सहाय्य केले होते.तसेच स्वातंत्र्य लढ्यात मदत केली होती,या दोन शहरांतील संबंध अजून असे वाढावेत”.असे प्रतिपादन राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांनी केले.बडोदे मित्रमंडळ पुणे यांच्या हिरकमहोत्सव समारंभात त्या बोलत होत्या.एमईएस सभागृह मयुर कॉलनी कोथरूड  येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शास्रज्ञ विजय भटकर,डॉ.बालाजी तांबे,माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र करमळकर,राजेंद्र माहुलकर,अविनाश जोशी,आदि मान्यवरांबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व बडोदे मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते.राजेंद्र माहुलकर यांनी आपल्या प्रस्तविकात मित्रमंदळच्या कारकीर्दीचा आढावा सादर केला.कार्यक्रमात “संतुलन जीवन संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला.तसेच गांगुताई पटवर्धन स्मृति व्याख्यान मालेत विवेक सावंत यांनी “आगामी काळातील शिक्षण आणि रोजगार या विषयावर व्याख्यान दिले.बडोदे संस्थानात काम केलेल्या ९० वर्ष वयाच्या ज्येष्ट नागरिकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाङगीळ यांनी केले.    

छायाचित्र :डावीकडून बालाजी तांबे,अविनाश नेने,शुभांगीराजे गायकवाड,विजय भटकर.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite