Peoples Media Pune header

Go Back

पोलिओ मुक्त जग करण्यासाठी रोटरी कटिबद्ध!अंजली देशमुख

26 Oct 2019

२४ ऑक्टोबर हा रोटरी इंटरनॅशनल मार्फत जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो.रोटरी अपटाऊनच्या वतीने डेक्कन जिमखाना ते फर्ग्युसन कॉलेज असा वॉकथान कार्यक्रम शुक्रवारी रोटरॅक्ट व इनरव्हील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.त्याचे उद्घाटन प्रांतपाल पुण्याच्या फर्स्ट लेडी जयश्री धोत्रे यांनी केले.या वॉकथान प्रसंगी रोटरी क्लब अपटाऊनच्या अध्यक्ष रो॰अंजली देशमुख यांनी रोटरी ही संस्था जगातून पोलिओचे कायमस्वरूपी निर्मूलन व्हावे यासाठी कटिबद्ध असून हा उपक्रम त्यासाठी व एकूणच व्यापक जनजागृतीसाथी आहे असे प्रतिपादन केले.या वॉकथान मध्ये रोटरी सदस्य,मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

छायाचित्र :पोलिओ जनजागृत करताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite