Peoples Media Pune header

Go Back

ज्येष्ठ पत्रकार स्व.अभिनंदन थोरात यांना ना.डॉ.नीलमताई गो-हे यांची आदरांजली.

02 Mar 2020

नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ पत्रकार व चिंतन ग्रुपचे सर्वसर्वा अभिनंदन थोरात यांना विधान परिषदेच्या उपसभापती आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी आदरांजली वाहिली.मॉडर्न कॉलेज सभागृह येथे त्यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आदरांजली वाहताना डॉ.गो-हे म्हणल्या अभिनंदन थोरात हे एक विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व होते.त्यांचा स्वभाव निगर्वी होता.त्यांना विविध सामाजिक बाबींची सखोल माहिती होती तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.सर्व पक्षीय लोकांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ होत होता असे संगितले.या सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच.अनेक मान्यवरांनी आपले शोक संदेश पाठविले. कार्यक्रमाचे प्रस्तविक त्यांची मुलगी जान्हवी थोरात यांनी केले.तर मुलगा चिंतन थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite