Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब गांधीभवनच्या वतीने सायबर विश्व जनजागृती व्याख्यानमालेस प्रारंभ.

07 Sep 2020

सायबर विश्व हे जीवनात अत्यंत महत्वाचे बनले आहे.कारण हे जीवनात सर्वस्पर्शी झाले आहे.सायबर म्हणजे फक्त क्राइमच नव्हे तर इंटरनेटचा योग्य वापर कसा  करावा याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी रोटरी क्लब गांधी भवनने “सायबर विषयी बोलू काही”या ४ भागांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.यात पहिले पुष्प अॅड.वैशाली भागवत (प्रख्यात वकील सायबर व सिव्हिल)यांनी गुंफले.या प्रसंगी ऑनलाइन झुम मीटिंग प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.अनिल परमार,नंदकुमार काकीर्डे,रोटरी क्लब गांधीभवनचे अध्यक्ष रो.शशांक सप्रे,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,युवा रोटरी सदस्य,व नागरिक असे सुमारे २२५ जण सहभागी होते.या मार्गदर्शन प्रसंगी बोलताना अॅड.वैशाली भागवत यांनी इंटरनेट हा महितीचा खजिना आहे मात्र याचा वापर योग्य रीतीने करावा,याचा वापर शिक्षण,उद्योग,मनोरंजन अशा अनेक प्रकारे करता येतो,यात काही गैरप्रवृत्ती ही असतात त्याच्या पासून कसे सावध राहवे,काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर सविस्तर विवेचन केले.तसेच सहभागी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

छायाचित्र :मार्गदर्शन करतांना अॅड.वैशाली भागवत 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite