Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब विज्डमच्या वतीने आयडियल स्कूलचे नूतनीकरण संपन्न.

05 Jan 2021

रोटरी क्लब विज्डम व वल्कन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील आयडियल इंग्लिश स्कूलचे “ हॅप्पी स्कूल”प्रकल्पा अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी रोटरीचे नियोजित प्रांतपाल रो. पंकज शहा वल्कन टेक्नोलोजीचे CEO राजेश मिश्रा,रोटरी क्लब विज्डमचे अध्यक्ष रो.राहुल चौधरी,सचिव श्रीकांत चाफेकर सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर निलेश धोपाडे यांच्या हस्ते या नूतनीकरणाचे लोकार्पन होणार आहे. ही शाळा आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गेल्या ८० वर्षापासून जिल्हा परिषदेसोबत कार्यरत आहे. या शाळेत १ ली ते १०वीचे ३०० पैकी १७५ विद्यार्थी शिकत आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थी कामगार-कष्टकरी वर्गातील आहेत जसे पाटील इस्टेट,कामगार पुतळा ई. या शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते,गेली २५ वर्ष इमारतींना रंग दिला नव्हता,सर्व २०० बेंचेस तुटके होते. वर्गखोल्यांची जमीन चांगल्या स्थितीत नव्हती. योग्य स्वच्छतागृहाचा अभाव होता. जिल्हा परिषदेकडूनही काहीच निधि मिळाला नव्हता.  या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी वल्कन टेक्नॉलॉजीच्या csrफंडातून ७०००००/-रु सात लाख व रोटरी विज्डमच्या वतीने ८०००००-रु आठ लाख म्हणजेच एकूण पंधरा लाख खर्च करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने जगभरातील शाळांचा शिक्षणाचा स्तर उंचविण्यासाठी हे हॅप्पी स्कूल प्रकल्प राबविण्यात येतो. हा प्रकल्प राबविणारी रोटरी विज्डम हा क्लब २०१४ साला पासून कार्यरत असून त्यात सुमारे ४० सदस्य कार्यरत आहेत अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.राहुल चौधरी यांनी दिली.    

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite