Peoples Media Pune header

Go Back

महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर व भव्य मिरणूक.

23 May 2023

महाराणा प्रताप यांच्या ४८३ व्या जयंती निमित्त राजपूत समाज संघ व महाराणा प्रताप युवक मंडळ यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लोकप्रिय आमदार रवींद्र धंगेकर,राजपूत समाज संघ अध्यक्ष सोमनाथ परदेशी,युवक अध्यक्ष रवींद्र परदेशी,जितेंद्र परदेशी,कृष्णा परदेशी,योगेश परदेशी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक स्त्री - पुरुष मोठ्या संखेने पारंपरिक वेशात उपस्थित होते. या मिरवणुकीत ध्वज पथक,ढोल ताशा पथक,बॅंड पथक,श्री॰महाराणा प्रताप यांच्या पुतळा असलेला सजवलेला रथ होता. सामाजिक जाणिवेतून सकाळी लाड समाज कार्यालय शुक्रवार पेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ.रविंद्र धंगेकर यांनी भव्य मिरवणूक व समाजसेवेसाठी रक्तदान शिबीर या उपक्रमाचे कौतुक केले.

छायाचित्र : मिरवणूक प्रसंगी मान्यवर.  

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite