Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शिवाजीनगर व रोटरी क्लब विज्डमचे शांतता पुरस्कार प्रदान.

10 Feb 2024
पुणे (दि.९) रोटरी क्लब शिवाजीनगर व रोटरी क्लब विज्डम यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी शांतता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. प्रशांत कोठडिया (शैक्षणिक कार्य), व अमित देवकुळे(सामाजिक कार्य). शाल,श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्वप्नपूर्ती हॉल पौडरोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल शितल शहा, डायरेक्टर पीस प्रदीप वाघ, रोटरी क्लब शिवाजीनगर अध्यक्षा डॉ.स्मिता जोग, रोटरी क्लब विज्डम अध्यक्ष सारंग बालंखे,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पदाधिकारी व रोटरी सदस्य उपस्थित होते. प्रदीप वाघ यांनी पीस अवॉर्ड संबंधी माहिती दिली. स्मिता जोग व सारंग बालंखे यांनी रोटरी क्लबची माहिती दिली. शितल शहा यांनी बोलतांना जागतिक शांतता यावर रोटरी हे सर्वात मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे असे सांगितले. सत्काराला उत्तर देतांना प्रशांत कोठडिया व अमित देवकुळे यांनी जागतिक शांतता ही आपल्या पासून म्हणजेच कुटुंबापासून सुरु होते.या पुरस्काराने आगामी कार्यास प्रेरणा मिळाली असे सांगितले. छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite