Peoples Media Pune header

Go Back

सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण ही फॅशन बनत चालली आहे.- गणेश पाचेरकर

14 Feb 2024
पुणे (दि.१४) आजकाल सर्वच पक्षातील प्रतिनिधी काही किरकोळ मुद्द्यावरून सर्कडी खात्यातील,पोलीस खात्यातील आणि उच्च पदस्थ अधिकारी (आय ए एस अधिकारी) कर्मचार्यांना शिवीगाळ करणे मारहाण करणे हे आजकाल स्वत:च्या राजकीय हेतूसाठी फॅशन झाली आहे.कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काही चुकीची कामे केली किंवा टेंडर चुकीची काढली तर त्यासाठी न्यायालय आहे.आपण ज्याला मारतो शिवीगाळ करतो त्या अधिका-याची आपल्यापेक्षा किती उंची मोठी आहे याचा विचार जर आपण विचार नाही करणार,तर येणा-या पिढीला आपल्या मुलाबाळांना आपण हेच दाखवणार का ?.की कर्मचारी चुकले की त्यांना शिवीगाळ करून मारहाण करायची हे प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेतले पाहिजे.यावरून पुढची पिढी तुमचा आदर्श घेईल का.मी याच्यासारखा नगरसेवक होईल मी याच्या सारखा आमदार होईल असा नक्कीच घेणार नाही.अशा वागणुकीमुळे देशाचे भवितव्य धोक्यात जाईल.आज पुणे शहरामध्ये स्वर्गीय गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाचवेळा आमदार,पालकमंत्री औषध व अन्न प्रशाषण कॅबिनेट मंत्री तसेच खासदार आशी उच्च पद या पुणे शहरात त्यांनी उपभोगलेली आहेत त्यांनी एव्हडे ४५ वर्षाच्या राजकारणामध्ये कधीही कुठल्या अधिकाऱ्यालाशिवीगाळ अपशब्द बोलणे आणि मारहाण तर नाहीच.आज त्यांचा आदर्श प्रत्येक कार्यकर्ता घेईलच पण अशा वागणुकीमुळे आपला आदर्श कोणीच घेणार नाही हे निश्चित.पुणे हे विद्येचे माहेरघर इथे पुणे सुशिक्षित लोकांची जत्रा आहे आणि या जत्रेतूनच पुणे शहर सुशिक्षितांचे माहेरघर म्हणून निर्माण झाल.आज अधिकाऱ्यांना,पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली ती या लोकप्रतिनिधीना माहित असते.हे एक निगेटिव्ह मार्केटिंग होत असते – नाव खराब होत असते.हे पुणे शहरातील नागरिक कधी खपवून घेणार नाहीत.आणि अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण केली जाते.जर असे लोकप्रतिनिधी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मारतात शिवीगाळ करतात,पोलीस खात्याला शिवीगाळ करतात त्यामुळे पोलिसांचा धाक जनतेवर राहणार नाही. आणि पुणे शहराचा बिहार होण्यास फार काल लागणार नाही.लोकप्रतिनिधींना पुणेकर एक चांगले नजरेतून बघत असतात,तुम्ही किती लोकांची चांगले काम करा पण अशी वागणूक जर अधिकाऱ्यांना दिली तर नागरिक त्याच नजरेतून लोकप्रतिनिधींना उतरून ठेवतील आची काळजी सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे असे गणेश निळकंठ पाचेरकर यांनी पत्रकात नमूद केले आहे. छायाचित्र : गणेश पाचेरकर

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite